‘नवा भारतीय’ अधिक मुक्त असावा; त्याची बौद्धिक, सांस्कृतिक आणि भौतिक उंचीही थोडी अधिक असावी!
तुम्ही तुमच्या हस्तिदंती मनोऱ्यात राहिलात आणि आम्ही आमच्या सत्तेच्या कैफात राहिलो, तर कसं होईल? कारण तुमची जी साधनं आहेत, तुमची जी माध्यमं आहेत; ती आमच्या माध्यमांपेक्षा फार श्रेष्ठ आहेत. म्हणून मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. जे कालातीत आहे, त्याचा वेध घेण्याची किमया साहित्यिकांमध्ये असते. तात्कालिकांत जे गुरफटलेलं असतं, त्याला चिरंतन करण्याची जादू आणि सामर्थ्य तुमच्याकडे असतं.......